spot_img
1 C
New York
Sunday, January 18, 2026

Buy now

spot_img

चिकन विक्रीचा वाद टोकाला

केज : गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे विविध गावातील वातावरण ढवळून निघालं आहे. दिवसाढवळ्या बीडमध्ये हत्या, बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, किरकोळ कारणावरून कोयत्याने वार, याकारणामुळे बीड गुन्हेगारीच्या केंद्रस्थानी आले आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक़्कादायक घटना घडली आहे.
चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाला उचलून आधी सिमेंटच्या नाल्यावर आदळले. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर अल्पवयीन मुलाने पलायन केले आहे. आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. बीडच्या केजमध्ये किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलाला सिमेंटच्या नाल्यावर आदळून त्याचा जीव घेतला आहे. रेहान कुरेशी असे मृत तरूणाचे नाव आहे. तो केज येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रेहान शेजारी असणार्‍या चिकनच्या दुकानात गेला. चिकनच्या दुकानात उपस्थित असलेल्या मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद टोकाला गेला. वाद इतका विकोपाला गेला की, त्याने रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर जोरात आपटलं. आपटल्यामुळे रेहानच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्यामुळे रेहानचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली, तसेच गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.

ताज्या बातम्या