spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

खोक्याच्या घरावर बुलडोजर वनाधिकार्‍यांवर कारवाई होणार

बीड : खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे वनविभागाने ही कारवाई केली होती. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण ४८ तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे परिणामी ही कारवाई करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलंय.
अशातच, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोख्या उर्फ सतीश भोसलेच्या या घरावरील कारवाई प्रकरणी वनमंत्री गणेश नाईकांनी मोठं विधान करत कारवाई संदर्भात सुतोवाच केलं आहे. वन अधिकार्‍यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांच घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडला असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. किंबहुना वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकार्‍यांनी घर पाडले असतील तर चौकशी अंती वनाधिकार्‍यांवर निश्चित कारवाई केली जाईल. असेही वनमंत्री गणेश नाईकांनी यावेळी सांगितलंय.

ताज्या बातम्या