spot_img
25 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

परळीत प्राचार्यांना बेदम मारहाण

बीड : परळी येथील मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. परळीत पोतदार इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांना जमावाने बेदम मारहाण केली. राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी शाळेत गोंधळ घालत प्राचार्यांवर हल्ला केल्याचे समजतेय. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांचा धाक कमी झालाय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्राचार्यांनी व्हिडिओतील आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज नवनवे गुन्हे समोर येऊ लागले आहेत. अशातच परळीमधील मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांना धाक उरलाय की नाही ? असा प्रश्न उपस्थित झालाय. परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पोतदार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ घातला. यावेळी शाळेच्या प्राचार्यांना मारहाण केली, याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
राजस्थानी मल्टीस्टेटमधील सर्व फरार असलेल्या आरोपींना पोतदार इंग्लिश स्कूलमधून मदत केली जात असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता. त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर तेथील प्राचार्य आणि ठेवीदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी तेथील प्राचार्य यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर येत असून या घटनेतील व्हिडिओ सध्या सर्वत्र सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. एकूणच परळीतील शिक्षण क्षेत्रही या दबाव तंत्रातून तुटलेले नाही असेच या व्हिडिओ वरून म्हणावे लागेल.

ताज्या बातम्या