spot_img
24.9 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

बीडच्या तरूणाचे झाडावर चढून आंदोलन

सुरक्षा यंत्रणांची तारांबळ, आमदारांनी क्रेनमध्ये बसून घातली सम…
मुंबई  : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपत आहे. अनेक नाट्यमय घडामोडी आणि तुफान आरोप प्रत्यारोपांमुळे हे अधिवेशन वादळी ठरलं आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका तरुणाने विधान भवन परिसरातील एका झाडावर चढून आंदोलन सुरू केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. खूप समजूत घालूनही हा तरुण ऐकण्यास तयार नव्हता.भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनमध्ये बसून या आंदोलकापर्यंत पोहोचून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी बरीच मनधरणी केल्यावर या तरुणाला खाली आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले.
ईश्‍वर शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी झाडावर जाऊन बसला होता. याबाबत अधिक माहिती देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, ईश्‍वर शिंदे नावाचा हा तरुण इंजिनियर आहे. तसेच त्याने एकूण 18 मागण्या केलेल्या आहेत. मी त्याची समजूत घालत त्याला सांगितलं की, तू खाली ये, आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ, तिथे तुझ्या ज्या काही मागण्या असतील त्यावर चर्चा करू. त्यानंतर त्याने माझं म्हणणं ऐकलं आणि तो खाली आला. सदर तरुण हा रात्री उशिरा किंवा पहाटे येऊन झाडावर बसला होता. या तरुणाने झाडावर चढून आंदोलन सुरू केल्यानंतर अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेल्या पोलिसांची धावपळ उडाली होती. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हा तरुण खाली येण्यास तयार नव्हता. अखेरीस अनुप अग्रवाल यांनी समजूत काढल्यानंतर तो खाली उतरला.

ताज्या बातम्या