spot_img
22.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या

नाशिकमध्ये रक्तरंजित थरार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, कोयत्याने हल्ला करत भावांचा जीव घेतला
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिकचे शहर उपाध्यक्ष आणि त्यांच्या भावाची कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. राहत्या घरासमोरच हल्लेखोरांनी जीव घेतला. या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, चिमुकल्या मुलासमोरच बापाचा जीव घेतला. हत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. रंगपचंपमीच्या दिवशीच जाधव नाशिकमध्ये हत्याची घटना घडली.
नाशिक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करून खून केला. नाशिकमधील बोधलेनगरजवळच्या आंबेडकरवाडीमध्ये जाधव यांच्या राहत्या घरासमोर हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केले आहे . या बाबत उप नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तसेच संशयित हल्लेखोर यांच्या मागावर चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
नाशिक पुणे रोडवरील आंबेडकर वाडी येथे दोघा सख्या भावांवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री आंबेडकर वाडी बोधले नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. उमेश जाधव आणि प्रशांत जाधव असे या दोघा मृत भावांची नावे आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पथक दंगा नियंत्रण पथक रुग्णालयमध्ये दाखल झाले होते. खुनाच्या घटनेने रंगपंचमीमध्ये बे रंग झाल्याने शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान एका लहान मुलांच्या समोर दोन्ही भावांवर टोळक्याने हल्ला केल्याने मुलगा घाबरून पळून गेला.
सुदैवाने कुटुंबीयावर हल्लेखोरांनी हल्ला केला नाही, मात्र दोघा भावांनी प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला, असे स्थानिकांनी सांगितले. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केले आहे . या बाबत उप नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तसेच संशयित हल्लेखोर यांच्या मागावर चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या