पुणे : मद्यधुंद अवस्थेत असताना गाडी चालवायला दे, असे म्हणत मालकालाच चालत्या गाडीतून फेकून दिल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे घडला. तसेच सदर गाडी अडवताना काही जण गंभीर जखमी झाले असून तीन व्यक्ती गाडी घेऊन फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कड या गावताली चार व्यक्ती बारामती येथे पोलिसांनी पकडलेले वाहन सोडवण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी वाहन सोडले नाही. त्यानंतर बारामतीमध्ये मद्यप्राशन करून हे चौघे भवानीनगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणार होते. गाडीचा मालक सुद्धा मद्यधुंद अवस्थे होता. यावेळी गाडीतील एका व्यक्तीने गाडी मला चालवायला दे, अस म्हणच चक्क गाडी मालकालाचा गाडीतून बाहेर फेकून दिले. त्यानंतर गाडीच्या मालकाने सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कामगारांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरुन गाडीचा पाठलाग केला, परंतु दुचाकीवरच गाडी घातल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तर मद्यधुंद अवस्थेत गाडी घेऊन सदर व्यक्ती या भिगवनच्या दिशेने गेल्या आहेत. भवानी नगरच्या नातेवाईकांना कळल्यानंतर हे धावत त्या ठिकाणी गेले व जखमी झालेल्या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.