spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

आ.सुरेश धसांचा पीए धाराशिवमध्ये बदडला,धसांची कबुली

धाराशिव : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी अशी मागणी व्हायला लागली. या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले. त्याच दरम्यान आशिष विशाळ हे नाव प्रकाशझोतात आले होते. देशमुख कुटुंबियांना मदत म्हणून त्याने अनेक अधिकार्‍यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र त्याचा व्हिडीओ आता वायरल होत असल्याने आ.सुरेश धसांनी सुरूवातीला पीए नसल्याची कबुली दिली होती . मात्र आता त्यांनीच यूटर्न घेत माझाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.
पैसे गोळा करण्यावरुन मराठा आंदोलकांनी आशिष विशाळला चोप दिला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करायची यासाठी आक्रोश मोर्चाच्या नावाखाली तो धाराशिवमध्ये पैसे गोळा करत होता. हे प्रकरण समोर आल्यावर त्याला मारहाण देखील झाली होती. तेव्हा आमदार सुरेश धस यांनी आशिष विशाळशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते. सुरेश धस यांनी युटर्न घेत आशिष विशाळ हा माझाच सहकारी असल्याची कबुली दिली आहे. धस यांच्या या वक्तव्यानंतर, आशिष कोणाच्या सांगण्यावरुन पैसे गोळा करत होता? त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि १८ लाख रुपये किंमतीची कार कुठून आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ’मी सुरेश धस यांचा पीए आहे’, असे सांगत तो सरकारी अधिकार्‍यांना धमकावत असल्याचे म्हटले जात आहे. आशिष विशाळ हा शासकीय अधिकार्‍यांकडून खंडणी जमा करत होता. धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या फोटो वापरुन पैसे गोळा करत असल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. मनसेने त्याच्या विरोधात निवेदन दिले होते. आता आशिष विशाळमुळे कोण-कोण अडचणीत येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या