spot_img
15.9 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img

पहिल्याच सुनावणीला वाल्मिक कराडांनी वकील बदलला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसापूर्वी आरोप पत्र दाखल केले. या प्रकरणात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपीमध्ये नाव आहे. या प्रकरणी आज न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. दरम्यान, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्याच सुनावणी आधी वाल्मीक कराड याने आपला वकील बदलला आहे.
आज होणार्‍या सुनावणीसाठी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख कोर्टात उपस्थित राहणार आहेत. तर देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लढणार आहेत. पण, आज ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. देशमुख यांच्याकडून आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत. तर वाल्मीक कराड याची आजपर्यंत अशोक कवडे हे न्यायालयात बाजू मांडत होते. पण यापुढे कोल्हापूर येथील वकील खाडे हे वाल्मीक कराड याची बाजू मांडणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. आरोपीचे वकील दोषारोपपत्राबाबत मुद्दे मांडू शकतात. आरोपींना जेलमधून केजमध्ये आणण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या