spot_img
11 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

लातूरजवळ भीषण अपघात!

लातूर : लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची घटना सोमवारी दुपारी १.४३ वाजण्याच्या सुमारास घडली. यात ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. तर सात जण गंभीर असून, दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाले आहेत. जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रूग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली. अहमदपूर आगाराची बस लातूरकडे येत असताना चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटली. घटनेनंतर जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोपचार रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
जखमींमध्ये प्रीती कानवटे (वय २२, रा. तळेगाव), अनुसया रोमपटवार (६०, रा. शिरूर), मुरलीधर बंदखडके (७०), रवी देशमुख, व्यंकट भोगे (६१, रा. हडोळती), पार्वती घुगे (४४, रा. अहमदपूर), महानंदा कांबळे (३२, रा. चाकूर), महादेव आडे (२३, रा. लातूर), गोविंद रोमपटवार (६०, रा. शिरूर), नसिम कुरेशी (५०, रा. लातूर), वर्षा घुगे (३३, रा. उदगीर), राम जमादार (३१, रा. चाकूर), गंगाधर सोपान बादाडे (४५, रा. अहमदपूर), वामन जाधव (६५, रा. चाकूर), प्रशांत कांबळे (४१, रा. चाकूर), बालाजी मोतीराम भुरे (५५, रा. अहमदपूर), अंजनाबाई माने (५०, रा. अहमदपूर), सुरेखा सूर्यवंशी (५०, रा. ममदापूर), अरुणा तोगरे (६३, रा. चाकूर), शाहुराज घोलप (४५, रा. राबुधोडा), शोभा मदने (३०, रा. गांजूर), अजित सुरवसे (२१, रा. ममदापूर), कपिल चिवडे (२१), सुनीता (३५, रा. चाकूर), मुरलीधर देवकते, इंदुबाई माडगे (५०), प्रथमेश माडगे, बशीर कुरेशी (५५), कमलाबाई (७०), सिद्धनाथ मदने (३५), शकुंतला सदानंदे (५५, रा. उदगीर), गजानन सोनकांबळे (१६, रा. टाकळगाव), सुकुमार गरेकर (२१, रा. टाकळगाव), गोरोबा मरडे (५४), अनुसया मरडे (३६, रा. चाकूर), सिद्धनाथ मरडे (१६, रा. चाकूर), कचरू गायकवाड (७५), लक्ष्मण येमले (५३, रा. लातूर), सिद्धेश्वर मदने (३५, रा. गांजूर), अब्दुल पठाण (रा. लातूर), शेख अझिमोद्दीन (रा. लातूर) यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या