spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

धनंजय मुंडेंचा थोड्यात वेळात राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागिलाय. सरपंच देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. भाजप आमदार आणि इतर विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
सरपंच संतोष देखमुख हत्येचे फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची चार्जशिट पोलिसांनी कोर्टात सादर केलीये. यानंतर समाजमाध्यमातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. आता याप्रकरणी मोठी बातमी हाती आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय. राजीनाम्याबाबत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना देखील बोलवण्यात आलं होतं. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ती, सरकारची प्रतिमा मलीन होताना दिसतेय. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. त्यामुळे आता धनंजन मुंडे राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने डखढ आणि उखऊ ची स्थापना केली. शनिवारी या प्रकरणी सीआयडीने १८०० पानी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याच सांगण्यात आलंय. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात येत असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आलेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीड तास चर्चा झाली. याच बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या