spot_img
7.9 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img

श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नाशिकमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्सव

नाशिक | प्रतिनिधी
मन चंगा तो कठोती में गंगा.. या म्हणीच प्रबोधन संत रोहिदास महाराजांनी समाजाला केले .आज नासिक येथे श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम लीला सांस्कृतिक शैक्षणिक वकीरणा मंडळाच्या वतीने संत रोहीदास महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमात बोलत असताना संस्थेचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे असे म्हणाले की संत रोहिदास महाराजांनी आपणास सत्य काय, चांगलं व खरं काय यावर प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे. आज समाजामध्ये विकृती वाढली आहे वय वृद्ध माता पितांना घराच्या बाहेर काढून दिले जातात त्यामुळेच आज वृद्धाश्रम खचून भरलेलं दिसतं. संत रोहिदास महाराजांनी फार वर्षांपूर्वी सांगितला आहे तुम्ही देव, धर्म, तीर्थस्थान, तीर्थक्षेत्र कुंभ ,महा कुंभ असे पुण्य मिळवण्याचे साधन व त्यासाठी करणारी धडपड करत असतात परंतु घरातच तुमचे वयवृद्ध आई-वडील म्हणजेच तुमचं दैवत आहे. तीर्थस्थान आहे. तीर्थक्षेत्र आहे. कुंभ, महाकुंभ त्यांच्या चरणी आहे त्यांचे सेवा करा परंतु आज समाज या गोष्टीत भरकटलेला दिसतो. वय वृद्ध आहे वडील यांची सेवा सोडून थोतांड गुरु महाराज आणि नको द्या मार्गाने पुण्य कमावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच आज संत महाराजांचे म्हण समाजाला लागू पडत आहे. समाजात आई-वडिलांचा स्थान देवापेक्षाही मोठे आहे त्यांचे सेवा करा वयोवृद्धांची सेवा दिव्यांग यांचे सेवा व दिनदुबळ्यांची सेवा हीच खरी पुण्य देणारी व मोक्ष देणारी सेवा आहे आज आपण या निमित्ताने वरील सर्वांचे सेवा करू आणि पुण्य मिळवून अशी शपथ घेऊ. असे बोलून कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या त्यांनी स्वागत केले व आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळेस उपस्थित श्री बबलू जी मिर्झा , श्री टिळे साहेब, हितेश पाटील, रोहन सानप, विनय श्री सागर राहुल आहेर ,तेजस दरगुडे, व समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या