spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

बीडचे पालकमंत्री झाल्यामुळे जालन्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे

मराठा कार्यकर्ते आक्रमक
जालना  : राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे. या प्रकरणानंतर गुंडगिरी, राखेतून वाढलेली अराजकता संपूर्ण राज्यात ठसठसते आहे. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत मराठा आंदोलन मनोज जरांगे आक्रमक झाल्याने प्रकरणाला पुन्हा धार लागली. बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जालना शहरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आलाय.
मस्साजोग प्रकरणात प्रमुख सूत्रधार असल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना धनंजय मुंडे ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री होतात, याचा आम्ही निषेध करतो असे म्हणत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. उपमुख्यमंत्री अजित पवार खाजगी हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या निमित्ताने जालना शहरात आज आले होते. यावेळी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा निघाला असताना मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
मस्साजोग संतोष देशमुख हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या दोन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर मराठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा आता सर्वपक्षीय नेते येऊन गेले. यानंतरही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळालेला नाही. याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं कार्यकर्ते म्हणाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वीकारलं, पुण्यात कोयता गँग, रेती गँग, जमीन हडपणार्‍याची गँग, मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर निघणारा पुणे जिल्हा गुंडयुक्त केला. त्या शहराला सुधरू शकले नाही आता बीडमध्ये आधीच वातावरण तापलं आहे. जातीत तेढ निर्माण करून मतांसाठी विभाजन करण्याचा यांचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांना पाठीशी गळण्यासाठी अजित पवार पालकमंत्री झाले. धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री असताना पालकमंत्री पद अजित पवारांनी दुसर्‍या पक्षाच्या मंत्र्याला द्यायला हवं होतं. या विरोधात आम्ही अजित दादांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्या