नाशिक | ज्ञानेश्वर काकड
राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ अशोक नगर, सातपूर नाशिक येथील स्वामी विवेकानंद नगर तुळजाभवानी फटांगण येथे क्रिकेट टूर्नामेंट कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीरामलीला शैक्षणिक ,सामाजिक , सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आलं होते. प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र व सन्मान पदक देऊन प्रथम, दुतीय ,तृतीया टीमला सन्मानचिन्ह देऊन व रोख रक्कम स्वरूपाचे पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्या खेळाडूंना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे यांनी फोनवरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला संयोग देणारे समाजसेवक श्री शरद भाऊ शिंदे यांनी विजेत्या टीमला परितोषिक सन्मान चिन्ह, त्यांच्या हस्ते देण्यात आले. श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षास्तव सौ. अरुणाताई दरगुडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ सर्व तरुण मंडळींना आश्वासित केले व राजमाता जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना अन्याच्या आदरणीय यांच्याविरोधात लढण्याची शिकवण दिली त्याचप्रमाणे मुलांनो तुम्ही देखील अन्याय सहन करू नका आणि लढाऊ वृत्ती व ध्येय पर्यंत पोहोचण्याची शक्ती ही आत्मसात करा. स्वराज्य स्थापना ही श्रीची इच्छा आणि ती शिवरायांनी पूर्ण केली तशीच या भारत मातेची तुम्हा तरुणांकडून खूप मोठी इच्छा आहे या देशाचं संरक्षण या देशातील मायमात्यांचा संरक्षण आणि सर्व धर्म समभाव व सर्व धर्मांचे रक्षण हे तुमच्या हातून घडलं पाहिजे. असं मत व्यक्त करण्यात आले व तरुणांकडून शपथ घेण्यात आली. आम्ही सर्व निर्व्यसनी राहू आणि माय माता व भगिनींचे रक्षण करू. संस्थेचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना स्वामी विवेकानंद त्यांच्या विषयी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की स्वामी विवेकानंदांनी आपले जीवन सर्व ब्रह्मचर्य ,गुरुनिष्ठ ,धर्मनिष्ठ आणि देशभक्ती यात समर्पित केले. स्वामींनी इंग्रजीत परदेशात भाषण करून आपल्या देशाचा झेंडा उंचावला याची आठवण तरुणांना करून देत असताना तुम्ही देखील इंग्रजी विषयी भीती बाळगू नका आणि आपल्या मातृभाषे बरोबर विदेशी इंग्रजी भाषेच सखोल ज्ञान घेऊन प्रभुत्व मिळवा . स्वामीं सारखा तुम्ही देखील आपल्या आई-वडिलांचं, गुरुजनां च्या अज्ञांचं पालन करा व देव ,धर्म ,राष्ट्रा साठी एकनिष्ठ राहा. असे आवाहन केले.