छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. १७ वर्षीय मुलीचा २०० फूट डोंगवरुन खाली ढकलून खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून देऊन संपवलं आहे. नम्रता गणेश शेरकर वय १७.२ वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय २५ वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.
नम्रता गणेश शेरकर वय १७.२ वर्ष अशी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय २५ वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आसपासचे अनेक लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रेम प्रकरणातूच ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे MIDC वाळुज छत्रपती संभाजीनगर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि संजय गित्ते, पोहे बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, सुरेश भिसे, सुरेश कचे, रमेश गोरखवाड, मनोज बनसोडे, राजू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.