किल्लेधारूर : जिल्हा परिषद केंद्रीय शाळा,अंजनडोह शाळेचे घटक मुख्याध्यापक .नामदेव रेवाजी आडे वय ५४ वर्षं यांचे धारूर आसरडोह रस्त्यावर गोपाळपुर जवळील अवघड वळणावर मोटर सायकल क्र. एम एच ४४ ए सी २११७ चा अपघात होऊन ३१ डिसेबर रोजी सायकाळी गंभीर जखमी झाल्याने अपघातात जागीच ठार झाले या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
तालूक्यातील आईचा तांडा येथील रहिवाशी अंजनडोह येथील जि प प्रा शाळेचे मुख्याध्यापक नामदेव रेवाजी आडे हे मग़ळवारी राञी धारूर मधील काम अटपून गावाकडे जात असताना गोपाळपुर जवळील एका अवघड वळणावर मोटरसायकल सरळ रस्त्याचे बाजूचे खड्ड्यात जाऊन चेहरा व डोक्याला गंभिर मार लागल्याने नामदेव रेवा आडे हे जागीच ठार झाले सकाळी धारूर कडे दुध घेऊन येणारे गोपाळपूर येथी दुधवाल्याचे लक्षात आली त्याऩी तात्काळ पोलीसाना कळवले या आपघाताची नो़द धारूर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कंरत आहे. मयत शिक्षक नामदेव आडे या़चे पार्थीहावर आईचा ता़डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे अपघाती निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात होती.