spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडलं

तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेत. अमरावतीहून कामानिमित्त बारा जण पुण्यात आले होते. मात्र, येण्यास उशीर झाल्याने ते रात्री फूटपाथवरच झोपले होते.
प्रशांत श्रीमंदिलकर पुणे : पुण्यात एक मोठी अपघाताची घटना घडलीये. या अपघातात डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले आहे. पुणे येथे हा भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडलीये. फूटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या ९ जणांना चिरडले. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष), वैभव रितेश पवार वय ३ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जातंय.

ताज्या बातम्या