spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

गोळीबारातील मुख्य आरोपीला बेड्या

बीड–  बीडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे, मुन्ना वाघ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी ही मोठी कारवाई केली आहे.आज या आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.अक्षय आठवले एका आमदाराचा निकटवर्तीय असल्यामुळे त्याला अभय मिळत असल्याच्या चर्चा होत्या. बीड जिल्ह्यात मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील घटनेत तर आरोपीनी गोळ्यांचा पाऊसच पडला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली.

ताज्या बातम्या