नाशिक : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटल्याची दुर्घटना घटना बुधवारी घडली. उरणमधील जेएनपीटी रुग्णालयात एकूण ५८ अपघातग्रस्त प्रवाशांना दाखल करण्यात आले होते. यामधील ५७ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेय. यामध्ये दोन जर्मन येथील परदेशी प्रवाशांचा देखील समावेश होता. तर यामध्ये एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. निधेश राकेश अहिरे असं या मयत मुलाचं नाव आहे. त्याच्या आई-वडिलांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय. राकेश नानाजी अहिरे व हर्षदा राकेश अहिरे अशी आई-वडिलांची नावं आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील बसवंत, पिंपळगाव येथील रहिवासी होते. तर मुंबई येथे अहिरे कुटुंबीय उपचारासाठी आले होते.
मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यासह चिमुकल्याचा मुत्यु झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश नाना आहेर हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबई येथे गेले होते. पण बोट दुर्घेटनेत आहेर कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र दुर्देवी अपघातात आहेर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळलाय.