spot_img
8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असून तो खुला फिरतोय,मुंडेंना मंत्री करू नका

संतोष देशमुख हत्येवरून संभाजीराजे संतापले
बीड : कुणावर तरी अन्याय होत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली जाते. ज्या प्रकारे ही हत्या करण्यात आली त्यावरून महाराष्ट्र हा बिहारच्या मार्गावर चाललाय का असा प्रश्न माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. खंडणी प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो वाल्मिक कराड अजूनही खुला फिरतोय, तर आरोपी सुदर्शन घुले फरार आहे अशा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवारांनी इथल्या आमदारांना मंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सात्वनासाठी संभाजीराजे बीडमध्ये गेले होते.
संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते? महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर चाललय का? पवनचक्कीच्या गोडाऊनवर सोनवणे यांना दमदाटी केली जात होती. त्याचा जाब विचारासाठी संतोष देशमुख गेले असता त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. यावेळी पोलीस मजा बघत होते. या प्रकरणात पोलिस निरीक्षकाला सहआरोपी करा.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे अजित पवारांनी परीक्षण करावे. या प्रकरणातील आरोपी विष्णूचा चाटे याला वाल्मिकी कराड सपोर्ट करतोय. वाल्मीक कराडवर दाखल असून देखील तो खुला फिरत आहे. सरकारला हे कसं जमतं? पोलिस महासंचालकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली. पण त्यांनादेखील या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणात जातीने लक्ष घाला अशी मागणी संभाजीराजेंनी केली. या प्रकरणाबाबत एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमताना जिल्ह्यातील कोणताही अधिकारी यावर घेऊन नये अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.
माझी अजितदादांना विनंती आहे की हे सगळे तुमच्या पक्षाचे लोक आहेत. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री करू नका. ही माझीच नाही तर इथल्या सगळ्या ग्रामस्थांची भूमिका आहे. अजितदादांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी. याबाबत सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा असं आवाहन मी करतो.

ताज्या बातम्या