spot_img
4.5 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

spot_img

देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकार्‍यांचे निलंबन

बीड -पवनचक्की च्या वादातुन निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलम्बनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
दरम्यान , आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी 2 पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षकांनी पीएसआय राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पीआय प्राशांत महाजन यांच्या निलंबनासाठी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. दोन्ही पोलीस अधिकार्‍यांवर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच विशेष सरकारी वकिलांची मागणीदेखील मान्य करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी 2 पथके रवाना झाल्याची माहितीदेखील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

ताज्या बातम्या