spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्यानंतर आज शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास शिवसेना शिंदे गटाकडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री कोण असतील?, याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार? आणि त्यांना कोणती खाती मिळणार? याची एक यादी समोर आली आहे. सोबतच राष्ट्रवादी त्यांच्या जुन्या खात्यांसाठी आग्रही असल्याचे कळते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खते, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, अनिल पाटील यांच्याकडे आपत्कालीन, अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आणि संजय बनसोडे यांच्याकडे क्रिडा खाते कायम राहण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवळ, धर्मरावबाबा आत्राम यांचीही नावे संभाव्य मंत्रीपदाच्या यादीत आहेत.

ताज्या बातम्या