गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. भंडारा- गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.