spot_img
21.7 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

spot_img

मुंडे,धस,क्षीरसागर,पंडित,मुंदडा,सोळंके विजयी

बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यातच महायुतीचा चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे परळी मतदारसंघ. या ठिकाणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय धनंजय मुंडेंचा झाला आहे. धनंजय मुंडेंना 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. तर, महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे.बीड, बीडमधून पुन्हा एकदा आमदारकीची माळ संदीप क्षीरसागर यांच्याच गळ्यात पडली आहे, आ. संदीप भैय्या यांनी बीडमध्ये महायुतीच्या लाटेला रोखत पुन्हा एकदा विजय मिळविला आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
केज मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून पुन्हा एकदा आ. नमिता मुंदडा यांनी विजयाची बाजी मारली आहे, त्यांनी 2809 मतांची आघाडी घेत साठेंचा पराभव केला आहे. याबद्दल नमिता मुंदडा यांचे अभिनंदन केले जात आहे.
आष्टीत पुन्हा सुरेश धसच आमदार होणार असून त्यांच्या विजयाचा रथ गतीने धावला. यामध्ये सुरेश धस विजयी झाले असून त्यांनी बाळासाहेब आजबेंचा पराभव केला आहे. माजलगावमध्ये आ.प्रकाश सोळंके बाजी मारणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विरोधकांचा धोबीपचाड करत गेवराई विधानसभेत बाजी मारली आहे,42332 मतांची आघाडी घेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिंनदनाचा वर्षाव केला जात आहे.

ताज्या बातम्या