spot_img
3.3 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img

पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन

बीड : येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक नागापूर येथील चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते.
येथील सायं दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावाकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की, प्रथम त्यांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रकांत साळुंके यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. चंद्रकांत साळुंके यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साळुंके परिवाराच्या दु:खात धैर्यशिल परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्या