spot_img
29 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंची खंत

परळी : धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं विधान भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही.
बीड जिल्ह्यातील परळीतून धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप शक्ती वाया घालवली. धनंजय मुंडे यांनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं, असं विधान करत पंकजा मुंडे यांनी करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
परळी विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, तुम्ही ते शोधणार आहात हे मला माहिती आहे. म्हणूनच धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते, पैशाची सत्तेची नसते, असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
याचबरोबर, परळीमधून 2009 ला आमदार होईल, असं माझ्या मनात कधीही नव्हतं. मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही. आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले. मी जीवनात काय चांगलं काम करू शकले, मला माहिती नाही. मात्र वाईट काम मी कधीच केलं नाही. मी ज्यावेळेस लोकसभेला उभी राहिली, त्यावेळी माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला, मला खूप चांगलं वाटलं, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
कुठलीही छोटी निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही. आपण प्रत्येक निवडणूक जीव लावून लढतो. त्यामुळं आपल्याला बदला घ्यायचा नाही, तर राजकारणाचा वातावरण बदलायचं आहे. मुंडे साहेब असते तर हे राजकारण बघून भावनिक झाले असते. त्यामुळं आपल्याला हा विजय मिळवायचाच आहे आणि गुलाल उधळायचा आहे. ईश्‍वरासमोर आणि मुंडे साहेबांव्यतिरिक्त कुणासमोरही झुकायचे नाही, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

ताज्या बातम्या