spot_img
18.6 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव

दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकानाला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला. फुलंब्री येथील मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वांचीच झोप उडवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकानाला आग लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. आग लागलेलं दुकान वाचवण्यासाठी गेले असता तिघांचा होरपळून मृत्यू झाला. फुलंब्री येथील एका प्लास्टिकच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. रात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली, स्थानिकांमध्ये रात्री भीतीचं वातावरण होतं. नितीन नागरे, गजानन वाघ, सलीम शेख अशी मयतांची नावं आहेत. नसतं धाडस तिघांच्या जीवावर बेतलं.

ताज्या बातम्या