spot_img
23.3 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img

ग्राहकांच्या प्रचंड उत्साहात अरेबियन ज्वेलर्सचा लकी ड्रॉ संपन्न!

१५०० हुन अधिक ग्राहकांची उपस्थिती; बदनाम करणाार्‍यांच्या तोंडावर चपराक!
बीड़ : ग्राहकांच्या विश्‍वासाच्या बळावर शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे अरेबियन ज्वेलर्स यांच्या लकी ड्रॉचा पहिला सोहळा १५०० पेक्षा अधिक ग्राहकांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात पार पडला. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अरेबियन ज्वेलर्सचे मनोबल उंचावले असून बदनामी करणार्यांच्या तोंडावर सभासदांनी चपराक बसवली आहे.


शहरातील प्रसिद्ध अरेबियन ज्वेलर्स यांच्या वतीने बंपर लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. या लकी ड्रॉ मध्ये हजारो सभासदांनी नोंदणी करत अरेबियन ज्वेलर्स विश्‍वास दर्शवला. शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे अरेबियन ज्वेलर्स कडून प्रथम बंपर लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. पंधराशे पेक्षा अधिक सभासदांच्या उपस्थितीत पारदर्शक प्रमाणे लकी ड्रॉ चे उद्घाटन करण्यात आले.लकी ड्रॉ ची मुख्य आकर्षक असणारी क्रेटा कार कोणाच्या नशिबी असणार याची चर्चा आशीर्वाद लॉन्स मध्ये सभासदात होती संध्याकाळी सात नंतर लकी ड्रॉ ला सुरुवात झाली हजारो ग्राहक, सभासदांची हृदयाचे ठोके वाढले, प्रथम पारितोषिकचे मानकरी कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते या लकी ड्रॉमध्ये क्रेटा कारचे मानकरी ठरले.योगेश अदाने तर द्वितीय पारितोषिकच्या मानकरी ठरल्या नीलिमा परमार . या सोहळ्यासाठी अरेबियन ज्वेलर्सचे संस्थापक फारूक पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. अरेबियन ज्वेलर्सच्या माध्यमातून शहरातील सभासदांसाठी भविष्यातही उत्कृष्ट व चांगल्या योजना घेऊन येणार असल्याचे फारूक पटेल यांनी यावेळी सांगितले. हजारो सभासदांच्या उपस्थितीमध्ये अरेबियन ज्वेलर्सचा प्रथम लकी ड्रॉ बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

ताज्या बातम्या