spot_img
11 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

केजमध्ये दोन लाखाची रोकड पळवली

केज : केज येथील एका फर्निचरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या व्यवसायिकाच्या कारमधील दोन लाखाची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.२४) केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशांत प्रदिप नेहरकर हे फर्निचरचे व्यवसायिक असून रात्री ८:०० च्या सुमारास ते आपल्या दुकानासमोर आपली कार उभी करून आपल्या दुकानात गेले. या कारमध्ये त्यांनी २ लाखाची रक्कम असलेली बँग ठेवली होती. कार लॉक न करता दुकानात गेल्याने यादरम्यान अज्ञात चोरट्याने ही बँग पळविली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या