राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना कोणताही थाट, बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन करायचं त्यांनी टाळलं आहे. साध्या पद्धतीनंच ते अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
तत्पूर्वी धनंजय मुंडे हे आईंचे आशीर्वाद घेऊन, गोपीनाथगड येथे स्व. गोपीनाथ मुंडे, कन्हेरवाडी परिसरात वडील स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन मग आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल करतील. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रोच्चारांत त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आहेत.
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाथरा या मूळ गावातून धनंजय मुंडे यांनी दौर्याला सुरुवात केलीय. नाथरा गावातील निवस्थानी आई रुक्मिणी मुंडे यांचे दर्शन घेवून, स्वर्गीय पंडित राव मुंडे यांच्या स्मृतिस्तंभावर नतमस्तक झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत बहिण पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष उपस्थित आहेत.
नाथरा गावात देवदर्शन झाल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं धनंजय मुंडे दर्शन करतील, त्यानंतर साधारण अकरा वाजता धनंजय मुंडे परळी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कोणतेही शक्ती प्रदर्शन होणार नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंडेंसोबत आहेत.
असा असेल अर्ज दाखल करण्याचा संपूर्ण कार्यक्रम :
सकाळी ८.०० वा. आईचे दर्शन स्थळ – नाथरा निवासस्थान
सकाळी ८.०५ वा. स्व.पंडित अण्णांच्या स्मृतिस्तंभाचे दर्शन, स्थळ – नाथरा निवासस्थान
सकाळी ८.१५ वा. हनुमान मंदिर नाथरा येथे दर्शन
सकाळी ८.२५ वा.पापनाशेश्वर मंदिर नाथरा परिसर येथे दर्शन
सकाळी ८.४० वा.नाथरा परिसरसतील मंदिरात दर्शन
सकाळी ९.२० वा. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी दर्शन, स्थळ – गोपीनाथगड, पांगरी
सकाळी ९.५० वा. स्व.पंडित अण्णा समाधीचे दर्शन, कन्हेरवाडी परिसर
सकाळी १०.१५ वा. वैद्यनाथ मंदिर दर्शन
सकाळी ११.०० वा. जगमित्र कार्यालय येथे भेट
त्यानंतर तहसील कार्यालय येथे अर्ज दाखल करण्यात येईल
पत्रकार संवाद – तहसील कार्यालय परिसर