spot_img
25.2 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

spot_img

मोटारसायकल चोर सासरवाडीत आला अन् पोलिसांनी पकडला

दुचाकी चोराकडून पाच मोटारसायकल जप्त
बीड-मागच्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई करत 16 मोटारसायकल जप्त केल्या होत्या.आता पुन्हा एकदा बीड शहरातील खासबागमधून एका दुचाकी चोराला शहर पोलिसांना ताब्यात घेत पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ही मोठी कारवाई केली.
दिवाळी सण तोंडावर आला असून दुचाकी चोरांची टोळी जिल्ह्यात सक्रिय होत असतानाच पोलिसांनी मोठ्या कारवाई करण्यास सुरुवात केली. शेख रहीम शेख राजू असे आरोपीचे नाव असून तो बीडच्या खासबागमध्ये आला होता. याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.यावेळी आरोपीने पोलिसांना पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून सदर दुचाकी पोलिसांचं ताब्यात दिल्या आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बाबा राठोड,मनोज परजने,अशपाक सय्यद,श्री.वायभसे यांनी केली.
शेख रहीम शेख राजू गेवराई तालुक्यातील उमापूरमधील रहिवाशी असल्याचे कळते.तो दुचाकी विक्रीसाठी बीड शहरातील खासबाग परिसरात असणार्‍या सासरवाडीत आला होता.याची माहिती शहर पोलिसांना कळल्यानंतर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.सासरवाडीत आलेल्या जावयाला पोलिसांनी मात्र ठाण्यात आणून चांगलाच पाहुणचार केला होता.
शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत.यातील चार मोटारसायकलचा शोध लागला असून दोन मोटारसायकल शिवाजी नगर हद्दीतून तर दोन मोटारसायकल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या.अन्य एक मोटारसायकल कोणाची आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या