spot_img
25 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

मांजरसुंबा-लिंबागणेश रोडवर गोळीबार;एक जखमी

बीड : राज्यभर सध्या आचारसंहिता चालू असून निवडणुकीच्या कामाला गती आली आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले असून काही गुन्हेगार वृत्तीचे लोक वातावरण बिघडवण्याचे काम करत असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरसुंबा-लिंबागणेश महामार्गावर असलेल्या मुळुकवाडी येथे गोळीबार झाला. यामध्ये हा गोळीबार तिघांनी केल्याचे समोर येत आहे. यामध्ये एकाच्या मांडीला गोळी चाटून गेली आहे.
शनिवारी रात्री १०:४५ च्या सुमारास घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. मांजरसुंबा लिंबागणेश रोडवर असलेल्या मुळुकवाडी जवळ संदीप गोरख तांदळे वय २८ वर्ष रा.हिंगणी खुर्द ता. बीडहोते.यावेळी स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच २३ बी डब्ल्यू ७६८९ मधून आणखी दोघांना सोबत घेऊन आलेल्या बाळा उर्फ विजयसिंह रामकिसन बांगर रा.पाटोदा याने संदीपतांदळे यास पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ असलेली पिस्तूल रोखून चार राऊंड फायर केले. यामध्ये संदीप तांदळे याच्या मांडीला गोळी घासून गेली यात तो जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी बाळा बांगर सह अन्य दोन आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम १०९ भारतीय दंड संहिता संहिता कलम ३,२५,२७ भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोळेबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या