spot_img
19 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img

आ.सतीश चव्हाण सहा वर्षासाठी निलंबित

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे इच्छूकांच्या पक्षबदलाच्या बातम्याही समोर येत आहेत. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार) पक्षाने पक्षविरोधी काम केल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण( यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार असून, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या जागेवर भाजपचा आमदार असल्यामुळे त्यांना महायुतीतून तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच ते शरद पवारांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही सतिश चव्हाण यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असे सतीश चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी थेट पत्र लिहून आपली भूमिका जाहीर केली होती. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

ताज्या बातम्या