spot_img
13.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img

‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; 1 हजार कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
बीड  : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी सोसायटीची 1002 कोटी 79 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समावेश आहे.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची 85 कोटी 88 लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील काही फ्लॅट, कार्यालयांची जागा आणि भूखंड, आदींचा समावेश होता. आतापर्यंत सोसायटीची एकूण 1097 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला. मात्र, त्यानंतर तो दिला नाही तर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपयादेखील परत मिळालेला नाही. कुटे यांनी 2318 कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपकाही ईडीने त्यांच्यावर ठेवला.
ज्ञानराधा सोसायटीने 12 ते 14 टक्के व्याजदराने परतावा देणार्‍या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम होत होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले आहे.

ताज्या बातम्या