पैठण येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळ्याप्रकरणी ज्ञानराधा व तिरूमला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्यासह संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर यांना छत्रपती संभाजीनगर विशेष न्यायालयाने ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या पैठणसह विविध जिल्ह्यातील खातेदारांनी ठेव म्हणून ठेवलेल्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला. याप्रकरणी २१ संचालकांसह अधिकारी आणि कर्मचार्यांवर पैठण पोलीस ठाण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सुरेश कुटे व आशिष पाटोदेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून गुरुवारी (दि.१०) छत्रपती संभाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले. त्यांना दि.१६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल सातोदकर करीत आहेत.