यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या दौर्यावर येणार असून त्या निमित्त ते पोहरा देवी येथे भेट देणार आहेत. त्याची तयारी करत असताना जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस जवळील कोपरा येथे हा अपघात घडला आहे. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजय राठोड ३ ऑक्टोबर रोजी यवतमाळच्या दौर्यावर होते. रात्री प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे होते. ते रात्री २ ते अडीच वाजेदरम्यान ते पोहरादेवी येथून निघाले. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. हा अपघात चांगलाच भीषण होता. या अपघातात पिकअप तसेच संजय राठोड यांच्या वाहनाची मोठी हानी झाली आहे. अपघातानंतर पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.