भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सवास गुरुवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अविनाश पाठक व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विधिवत श्री. योगेश्वरी देवीची महापूजा केली.या महापूजे नंतर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
श्री योगेश्वरी देवीचे नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.गुरुवारी सकाळी ०८ वा घटस्थापना व महापुजा जिल्हाधिकारी अविनाश पाठक व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विधिवत श्री. योगेश्वरी देवीची महापूजा केली.यावेळी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे,देवल कमेटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी,सचिव अशोक लोमटे,कोषाध्यक्ष शिरीष पांडे,
देवीचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, विश्वस्त संजय भोसले,प्रवीण दामा,हंसराज देशमुख,डॉ.संध्या जाधव,सतीश लोमटे,अमोल लोमटे,राजपाल भोसले,राजाभाऊ लोमटे,अमित चव्हाण,रवि कदम यांच्यासह पुरोहित,मानकरी पत्रकार व भक्तांची उपस्थिती होती.नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दररोज मंदिरात संगीत भजन,कीर्तन,प्रवचन,व विविध उपक्रम राबविले जात आहेत.भाविकांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आवाहन देवल कमेटी च्या वतीने करण्यात आले आहे.