बीड : बीड जिल्ह्यातील गायरान जमिनीसहीत विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा पी आर पी चे मराठवाडा सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यातील असंख्य गायरान धारक, विविध शासनाच्या योजने पासून वंचित राहिलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील कसत असणार्या शेतकर्यांना सातबारा तात्काळ देण्यात यावा. गायरान धारक शेतकर्यांच्या सातबारा वरील पोट खराब शब्द काढून त्यांना खरीप, रब्बी, पिक विमा भरण्याचा व राष्ट्रीयकृत बँकेकडून पिककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करून पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा व इतर शासनाच्या सर्वयोजनेचा लाभ देण्यात यावा. महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास चर्मकार महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अपंग महामंडळाला तात्काळ निधी देऊन प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थीचे प्रस्ताव तात्काळ मंजुर करण्यात यावेत. शासकीय जागेवर घरे बांधून राहणार्या शहरातील, ग्रामीण भागातील नागरीकांना पी.टी.आर. देऊन शासनाच्या इतर योजनेचा लाभ देण्यात यावा. भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरीकांच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा. पारधी भिल्ल समाजातील बांधवाना शासनाने जात प्रमाणपत्रासाठी अडवणूक करण्यात येऊ नये व तात्काळ देण्यात यावे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी बोगस, बनावट असून विद्याथी, विद्याधीनी, नोकरीदार यांचं परस्पर जात वैधता प्रमाणपत्र घेऊन वस्त्रउद्योगाचे 27 कोटी, समाजकल्याणचे 14 कोटी ऊचलुन शासनास फसवले यांची उच्च पातळीवर चौकशी करण्यता येऊन मुख्यप्रवर्तक संगिता ठोंबरे व चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे विरूध्द 420 चा दाखल करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी. केज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी चौकशी प्रकरणी र्वारष्ठांचे आदेश पायदळी तुडवत आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.बीड नगर परिषदेने स्वच्छता टेंडर बंद करून शहरात सफाई काम करणार्या शेकडो महिलांना कामावरून कमी केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तरी तात्काळ कामावर घेण्यात यावे. संत भगवान बाबा समाज कल्याण अंतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांचे, मुलीचे वस्तीगृहात निकृष्ट जेवण दिले जात असून सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व टेंडर रद्द करण्यात यावे यासाठी मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा पीप्लस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करू आसा इशारा दिला आहे.