spot_img
22.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

बदलापूर अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचे एन्काउंटर

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आरोपी अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केली. यात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. त्याचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला आहे. तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे.
आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेर्‍यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते.

ताज्या बातम्या