spot_img
10.6 C
New York
Monday, November 3, 2025

Buy now

spot_img

विवाहिरीत पोहताना मुलीचा बुडून मृत्यू

अंबाजोगाई : स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यु झाला. ही घटना अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथे आज रविवारी (दि.२२) रोजी सकाळी घडली.
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथील स्वतःच्याच शेतातील विहिरीत पोहताना एका १३ वर्षीय मुलीचा रविवार (दि.२२) रोजी सकाळी बुडून मृत्यु झाला. कल्याणी कानोबा गोचडे (वय १३) असे मयत बालिकेचे नाव आहे.ती सातवीच्या वर्गात शिकत होती. कल्याणीला पोहायला येत होते. रविवारी सकाळी शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरली. मात्र पोहताना तिला धाप लागल्याने ती पाण्यात बुडाली.यावेळी तेथे उपस्थित असलेला तिचा भाऊ व चुलते यांनी तात्काळ तिला पाण्यातून विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. कल्याणीच्या मृत्युने चनई गावात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या