spot_img
8.8 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’संचालकांची खाजगी मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे

बीड : जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हॉंगकॉंगला पळवल्याचा ठपका असणार्‍या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल करत घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकरने दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे निर्देश दिले आहेत. सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला १५ दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत येणार आहे.
बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे सध्या कोठडीत आहेत. दरम्यान याच प्रकरणी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे बैठक घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.
ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्यात आला आहे. याचा गुंतवणूकदारांना तसेच फसवणूक झालेल्या ठेवीदारांना याने दिलासा मिळणार आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे खासगी मालमत्ता एकत्र करून त्याचे मुल्यांकन केले जाईल व त्यानंतर ठेवीदारांना यातून आलेली रक्कम समान देण्यात येते.
चडउड कायदा २००२ च्या कलम ८६ अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला १५ दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिनियमाच्या कलम ८९ अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम २८ आणि २९ नुसार सोसायटीच्या दायित्वाचे वितरण करण्यासाठी केला जाणार आहे.
मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर २०२३ मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख ७० हजार ठेवीदार, खातेदारांचे ३७०० कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर ४२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ५० शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी ५० शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.

ताज्या बातम्या