spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

नाशिक मध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा इंदिरानगर येथील वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी साडेसहा वाजता पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता परिसरात घडली. ओंकार चंद्रकांत गाडे (वय २३) व स्वयम मोरे (वय १८) अशी या युवकांची नावे आहेत. हे दोघेही पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा कॉलनीमधील रहिवासी आहेत.
मंगळवारी मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडले. ते दिसानासे झाल्याने मित्रांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला. मात्र ते अपयशी ठरले. त्यांनतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, माजी नगरसेवक भगवान दोंदे ,धनंजय गवळी, मदन डेमसे आदींनी घटनास्थळी जाऊन अग्निशामक दलाला सहकार्य केले. एका तासानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. ओंकार केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर स्वयम संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या उमद्या मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या