बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल मध्ये मोदक स्पर्धा संपन्न
नगर : विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे श्री गणेश उत्सवा निमित्त मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा होते. कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. सुचिता भावसार हे होते.
यावेळी प . पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याचे हस्ते करण्यात आले या वेळी संस्थे चे संचालक रुपाली रहोकले, सौ. पारगावकर उपस्थीत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना मा. नगरसेविका वीणा बोज्जा म्हणाले गणेशोत्सव हा सण टिळकांनी समाजात एकीकरण निर्माण होण्यासाठी व सामूहिकता निर्माण होऊन एकमेकांमधील संबंध चांगले व्हावे या साठी सुरु करण्यात आले. सहजयोग ध्यान साधना केल्यामुळेही आपणास मनःशांती मिळून आपसातील संबंध दृढ होतात. ही ध्यान साधना केल्यामुळे सुप्त कलागुणांना वाव मिळतो.
या वेळी शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या मोदक बनविण्याचे स्पर्धेत विदयार्थ्यांच्या पालकांनी तसेच परिसरातील महिलांनी या स्पर्धेत मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. या मोदक स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीषा लोखंडे, द्वितीय अंजना डेंगळे व तृतीय क्रमांक आराध्या पवार यांना देण्यात आला, विजेत्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापिका उषा गरड यांनी सूत्रसंचालन केले, उपमुख्याध्यापिका संगीता गांगर्डे यांनी पाहुण्याचे स्वागत केलं तर पर्यवेक्षक सौ दिपाली हजारे यांनी आभार मानले. या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ रूपाली जोशी, सौ पूजा चव्हाण, सौ आरती हिवारकर, सौ अर्चना चव्हाण, वैष्णवी नजन, निकिता पाळंदे, सीमा हिवाळे व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.