spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

पिकअप-इको गाडीची धडक;४ जागीच ठार

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जण गंभीर गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमीला उपचारासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या