spot_img
27.4 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

अवैध धंद्याच्या विरोधात मोगरा येथील महिला रस्त्यावर.

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे.ज्यामुळे गावासह आजू बाजूच्या पंचक्रोशीतील तरुणाई बिघडत चालली आहे.यावर नियंत्रण ठेवणारे महसूल व पोलीस प्रशासन हप्ते खाऊन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मोगरा येथील महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे तरुणाई बिघडत चालली आहे.गावामधे दारु पिऊन रिकामटेकडे दररोज धिंगाणा घालत आहेत.गावामधे मटका खुलेआम खेळला जात आहे.वाळु उपसा जोरात दारु जोरात चालु आहे.अशा कमी मेहनतीचा पैसा हातात पडत असल्यामुळे गावातील तरुण बरबाद होत आहेत.ज्याचा परिणाम कुटुंब बरबाद होत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत.परंतु याबाबत प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही.त्यामुळे गावातील महिलांनी पोलीस व महसूल प्रशासनावर हप्ते खोरीचा आरोप करत गावातील आंबेडकर चौक येथे रस्त्यावर आंदोलन केले.यावेळी दिपाली घनघाव,गया घनघाव,सुमन वावळकर,आश्रुबाबाई घनघाव, सोनाबाई फुलवरे,गंगुबाई धुमाळ, कुलता पांढरपोटे,द्रोपदीबाई चोपडे, वंदना गायकवाड,मधुकर घनघाव, उद्धव धुमाळ,गिन्यानदेव राठोड, नरहरी गायकवाड,इत्यादींचा सहभाग होता.दरम्यान महिलांमध्ये प्रशासनाच्या हप्तेखोर भूमिकेचा मोठ्या प्रमाणात संतोष दिसत होता.

ताज्या बातम्या