spot_img
-5.6 C
New York
Friday, January 2, 2026

Buy now

spot_img

परळी-गंगाखेड रोडवरील सिमेंट फॅक्टरी परिसरात आढळला मृतदेह

परळी: येथील मथुरा मल्टी पोखरकर (40) यांचा गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास परळी – गंगाखेड मार्गावरील रेल्वेरुळाजवळ सिमेंट फॅक्टरी परिसरात मृतदेह आढळून आला. या परिसरात त्यांची दुचाकीही पोलिसांना दिसून आली आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, सचिन पोखरकर यांनी आत्महत्या केली की घात झाला या विषयी चर्चा सुरू आहे.


गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश तोटेवाड, जमादार पवार व वाहन चालक मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन पोखरकर यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणण्यात आला. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ सचिन पोखरकर यांचे मथुरा मल्टी सर्विसेस नावाने दुकान आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

ताज्या बातम्या