spot_img
11.9 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधी धाराशिवमध्ये सावंंतांच्या घरासमोर गोळीबार

धाराशिव : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धकक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धकक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे. परांडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, उद्या १४ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परांड्यात सभा पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही घटना घडली असल्यानं जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे परंडा तालुक्यातील सोनारी इथं घर आहे. या घरासमोर मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या १४ सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत. मात्र त्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा गोळीबार कोणी केला? कशातून गोळीबार झाला? हे पोलिस तपासात समोर येईल. अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

ताज्या बातम्या