spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

गणपती स्थापनेचे ३ मुहूर्त

देशभरातील विशेषत: महाराष्ट्रातील तरुणाईच्या उत्साहाला शनिवारी उधाण येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होईल. घरोघरी बाप्पांची स्थापना केली जाईल. अनेक दिवसांपासून बाप्पांच्या आगमनाची ओढ लागलेल्या बच्चे कंपनीमध्ये तर कमालीचा उत्साह आज दिवसभर असेल.
गणपती स्थापनेचे ३ मुहूर्त
१) सकाळी ८ ते ९.३०
२) सकाळी ११.२० ते दुपारी १.४०
३) दुपारी २ ते सायंकाळी ५.३०
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाच्या पूर्वतयारीवर, आरास सजावटीवर अखेरचा हात शुक्रवारी फिरवण्यात आला. काही मंडळांच्या आरास सजावटी खोळंबलेल्या आहेत. उत्सवाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत त्या पूर्ण करण्याकडे मंडळांचा कल असेल. गणेश स्थापनेसाठी यंदाच्या गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला दिवसभरात ३ मुहूर्त आहेत. ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना सूर्यास्तापूर्वी करावी, असे विधान आहे. गणेश पुराणानुसार गणेशाचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्रात माध्यान्ह काळात म्हणजेच दिवसाच्या दुसर्या प्रहरात झाला होता. हा अत्यंत शुभ असा काळ शनिवारी ११.२० वाजेपासून सुरू होईल.

ताज्या बातम्या