spot_img
3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img

राष्ट्रवादीचे चार तर महायुतीचे दोन आमदार असतील-ना.मुंडे

जन सन्मान यात्रेचे बीडमध्ये जंगी स्वागत
लाडकी बहिण योजना सुरूच राहणार; अजितदादांचा वादा
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नियोजनाचे केले कौतुक
बीड  : जनसन्मान यात्रेतून आम्ही आमच्या भूमिका सांगतोय. गत अर्थ संकल्पात वारकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुण यांच्यासाठीच्या योजना काय आहेत हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. जनतेचा सन्मान करायचा हा यात्रेचा खरा हेतू आहे. राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजना अविरतपणे सुरू राहणार आहे, हा माझा वाद आहे, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दिला.
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नियोजनातून बीडमध्ये जन सन्मान यात्रेचे गुरुवारी जंगी स्वागत करण्यात आले. हेलीपॅडवर उतरताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील नगर रोड मार्गे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रस्त्यात ल व्यापारी बांधवांसह अल्पसंख्याक समाजाचे निवेदन स्वीकारले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अजितदादा पवार यांनी जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित सभेला संबोधित केले.
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडीत, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, बीड विधानसभा डॉ.योगेश क्षीरसागर, राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष ड.राजेश्‍वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव गवते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश व जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.


पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, मी दहावा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी विशेष तरतूद करण्याचे ठरविले होते. त्यानुसार माझी लाडकी बहिण योजना राबविली. त्याचा महिलांना लाभ मिळतोय. परंतु विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. माझा वादा आहे की, बहिणींना कधी फसवणार नाही. ओवळणीत बहिण कधीच बहिणीला फसवत नसतात. आमच्यातले काहीजण चुकले, पण एकही बहिणीचा एक रुपया काढून घेतला जाणार नाही. विरोधकातील काहीना चांगल्या योजनेचा बोजवारा करायचा आहे. आता 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर तुमच्या अकाऊंटला पैसे देणार आहे. थेट खात्यवरच पैसे जात आहेत. गरिबांचे सर्व सामन्याचे सरकार आहे. शिक्षण घेण्यासाठी मुलींना 100 फी देण्याचा निर्णय घेतला आहे असेही ना.अजितदादा म्हणाले. शासनाच्या अनेक योजनांची तपशीलवार माहिती त्यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचे आवाहन अजितदादांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, फारूक पटेल, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ड.प्रज्ञाताई खोसरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, लिगल जिल्हाध्यक्ष ड.नागेश तांबारे, अल्पसंख्याक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शाकेरा शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश शिंदे, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष इंजि.अजिंक्य आनेराव, माजी सभापती काकासाहेब जोगदंड, ड.राजेंद्र राऊत, युवक तालुकाध्यक्ष नंदकुमार कुटे, ड.राजेंद्र राऊत, नगरसेवक शुभम धूत, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अजित पवार यांचा सत्कार केला. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नियोजनाचे नेते मंडळींनी कौतुक आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन शिप्रा मानकर, प्रा.पांडुरंग सुतार यांनी केले. आभार ड.प्रज्ञा खोसरे यांनी मानले.
राष्ट्रवादीचे चार,महायुतीचे सहा
आमदार असतील-ना.धनंजय मुंडे
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे सांगितले. या सरकारने शेतकर्‍यांना वीज बिल माफी दिली. सामान्यांसाठी सरकारची तिजोरी खाली केली. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार तर महायुतीचे सहा आमदार असतील अशी ग्वाही दिली.
अजितदादा तरुणाईच्या गळ्यातील ताईत : डॉ. योगेश क्षीरसागर
जनसन्मान यात्रेतून ना.अजितदादा पवार हे सर्वसामान्य घटकातील महिला, पुरुषांसह तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर एक वर्षाच्या कमी कालावधितही अजित पवारांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न केले. तसेच मराठा भवनासाठी निधी देण्यासह उर्दू घर, शेतकर्‍यांसाठी सोलार योजना, मोठया गावांमध्ये व्यायामशाळा, बीड शहरातील प्रलंबित रस्ते आणि बीड शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याच्या मागण्या केल्या.

ताज्या बातम्या