spot_img
17.4 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

बाळासाहेब घुगे यांना राष्ट्रसंत भगवानबाबा साहित्य रत्न पुरस्कार प्रदान

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
अहिल्या नगर येथे दुसरे साहित्य संमेलनपार पडले. वंजारी समाज साहित्य संमेलन पार पडले येथे राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्य रत्न पुरस्कार २०२४ यंदा सामाजिक व राजकीय क्षेत्रात तसेच दिव्यांग बांधवांसाठी करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांना देण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी खांडे कवी व लेखक वा ना आंधळे संमेलन अध्यक्ष संगीता ताई घुगे जेष्ठ उघोगपती बुधाजी दादा पानसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब घुगे यांनी असे म्हटले कि आम्ही आजपर्यंत करत असलेल्या दिव्यांग बांधवांच्या कार्याची दखल घेऊन समाज भुषण पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो व येथून पुढे अशीच समाजसेवा चालू ठेवेल असे म्हटले यावेळी दैनिक वंजारी पुकार चे दत्ता जायभाये दैनिक अतुल्य महाराष्ट्र चे संपादक नितीन ढाकणे बाळासाहेब फड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संमेलन अध्यक्ष राजकुमार आघाव यांनी प्रास्ताविक केले तर आभार स्वागत अध्यक्ष मल्हारी खेडकर यांनी मानले.

ताज्या बातम्या