spot_img
0.7 C
New York
Wednesday, December 10, 2025

Buy now

spot_img

बीड-नाथापूर रस्त्यावर अपघात; एक ठार

बीड : बीड-नाथापूर रोडवरील उमरी फाटा या ठिकाणी दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुसरा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून पळून गेल्याचे समजते.
बीड-नाथापूर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मण मस्के रा.राक्षसभुवन हे मोटारसायकलवर जात असताना दुसर्‍या बाजूने आलेल्या भरधाव मोटारसायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये लक्ष्मण मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मोटारसायकलस्वार हा घटनास्थळावरून पळून गेला. येणार्‍या जाणार्‍या लोकांनी लक्ष्मण मस्के यांना रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

ताज्या बातम्या